मोडनिंब – अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे धर्माचे तत्व आहेत. हे पाचही तत्व मनुष्य जीवन जगत असताना गरजेचे असल्याचे प्रतिपादन वेदांताचार्य बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी केले. टेंभुर्णी (ता. माढा) येथे संगीतमय भागवत कथा सप्ताहाच्या सांगते प्रसंगी कथेच्या विवेचनात त्यांनी सांगितले.टेंभुर्णी येथे आयोजित संगीतमय भागवत कथा सप्ताहाची उत्साही वातावरणात सांगता झाली. सांगता प्रसंगी वेदांताचार्य बालयोगी गोपाल महाराज कारखेडकर यांनी अध्यात्म, सदाचार आदी विषयांवर प्रवचनपर मार्गदर्शन केले.
मल, विक्षेप आणि आवरण असे तीन दोष आहेत. निषिद्ध कर्म करण्याची वासना तिथ मल दोष. स्नानसंध्या केल्याने दोष नष्ट होतात. तर चित्ताची चंचलता झाली की, विक्षेप दोष निर्माण होतो. देवाच ध्यान केल्याने विक्षेप संपून जातो. तिसरा आवरण जो पर्यंत बुद्धीच्या ठिकाणी अज्ञानाच आवरण आहे. एकदा ज्ञान प्राप्त झाले की अज्ञानाच आवरण नष्ट होते.माझी जीवाची आवड, पंढरपुरा नेईल गुढे पांडुरंगी मन रंगले । पंढरपुरची वारी करा. एकादशीच व्रत करा.कपाळी तिलक करा. चांगल कर्म करा. अन्नदान करा. पांडुरंगाच दर्शन घ्या.पवित्र तुळशीची माळ घाला.जगा आणि जगू द्या. टेंभुर्णी येथील भागवत कथा सप्ताहाच्या सांगता दिवशी गोपाल महाराज कारखेडकर यांचा संयोजक व समस्त टेंभुर्णी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कथा ऐकण्यासाठी एक ते दीड हजार भाविकांचा सहभाग
टेंभुर्णी (ता. माढा) येथे सुरू असलेल्या संगीतमय भागवत कथेचा समारोप झाला. कथा श्रवण्यासाठी सुमारे एक ते दिड हजार भाविक उपस्थित असतात.या सप्ताहाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १९ एप्रिल पासून या सोहळ्याची सुरुवात झाली. २५ एप्रिल ला सांगता झाली.यात महिलांची उपस्थिती अधिक असते.कथा श्रवण्यासाठी टेंभुर्णी, मोडनिंब, इंदापूर, बेंबळे, नंदोरे व पंचक्रोशीतून भाविक उपस्थित असतात.टेंभुर्णी ग्रामस्थाच्या वतीने आयोजित या सोहळ्याचे यंदाचे यजमान सौ व श्री सुधाकर जोशी हे होते.

























