टेंभुर्णी : माढा शहरातील स्वप्निल विष्णू कुंभेजकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा भाजप युवती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा ॲड. संध्या विष्णू कुंभेजकर यांच्या वतीने गुरुवार, दि. २१ ऑगस्ट रोजी टेंभूर्णी (ता. माढा) येथील जनजागृती प्रबोधन मंच संचलित मुकबधीर निवासी शाळेमध्ये अन्नदानाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रेमाने व आपुलकीने अन्नदान करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च करण्याऐवजी समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देत गरजू विद्यार्थ्यांसाठी अन्नदानाचा उपक्रम राबवून ॲड. संध्या कुंभेजकर यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात सेवाभावाची भावना वृद्धिंगत होत असून, युवकांनीही वाढदिवसासारखे आनंदाचे क्षण समाजहितासाठी साजरे करावेत, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा पाटील यांनी या उपक्रमाबद्दल कुंभेजकर कुटुंबीयांचे आभार मानत विद्यार्थ्यांप्रती दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. कार्यक्रमास सम्राट पाटील, अभिजित पोरे, विशाल ठेंगल, अरमान मुल्ला, शांताबाई आगलावे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्नदानाचा हा उपक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
Post Views: 29