सोलापूर जिल्हा परिषदेने मराठी माध्यमासाठी ५०० शिक्षकांची मागणी केली होती. कन्नड व उर्दू माध्यमाचे रोस्टर अपूर्ण असल्याने या दोन्ही माध्यमांच्या प्राथमिक शिक्षकांच्या जागा पवित्र पोर्टलच्या पहिल्या टप्प्यात भरण्यात आल्या नाहीत सध्या कन्नड व उर्दू माध्यमांच्या रोस्टरचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या ५०० मधील उर्वरित तर उर्दू व कन्नड माध्यमांच्या शिक्षकांच्या जागा पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्यात भरल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चौकट
खाजगी शाळेतील ८० शिक्षक अतिरिक्त
खाजगी प्राथमिक शाळातील ८० शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. त्यांचे समायोजन सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यात मराठी माध्यमाचे ६६ ,कन्नड माध्यमाचे आठ तर उर्दू माध्यमांच्या सहा शिक्षकांचा समावेश आहे.
चौकट
शिक्षक दिनी तालुका व जिल्हा स्तरावर पुरस्काराचे वितरण
५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पुरस्काराचे वितरण होणार आहे. जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण सोलापूर शहरात तर तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार याचे वितरण त्या – त्या पंचायत समिती स्तरावर होणार आहे. २०२४-२५ व २०२५ -२६ या दोन वर्षातील जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण होणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यावर सर्वसाधारण एक व शिष्यवृत्ती एक अशा प्रकारे ४८ पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी ४७ च्या वर प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.४ सप्टेंबर रोजी पुरस्काराची घोषणा करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी मुळे यांनी सांगितले.