सोलापूर : इंडियन आर्मीच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत सोलापूरचे चिरंजीव हर्षल सूर्यकांत लिंगराज यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महापौरांनी हर्षल यांचे अभिनंदन करत देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी निवड झाल्याबद्दल कौतुक केले.
महापौर कोंडयाल यांनी हर्षल लिंगराज यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना, युवकांनी सैन्य दलात प्रवेश करून राष्ट्रसेवेसाठी योगदान देणे ही अभिमानाची बाब आहे. त्यांच्या यशामुळे इतर युवकांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी हर्षल यांचे वडील तथा सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागातील कर्मचारी सूर्यकांत लिंगराज उपस्थित होते. मुलाच्या यशाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करत त्याच्या मेहनतीमुळे हे यश मिळाल्याची भावना व्यक्त केली. अग्निवीर भरतीत निवड झाल्यामुळे लिंगराज कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध स्तरांतून हर्षल यांचे कौतुक केले जात आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह सोलापूर शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Post Views: 14