पिलीव – माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथे राशी सिडसचयावतीने कुसमोड येथील दादासो काळे यांच्या शेतात मका पिकाचे प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुसमोडचे सरपंच शहाजी लेंगरे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच संजय पाटील, पिलीव विकास सोसायटीचे संचालक तथा झिंजेवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विठ्ठल मदने सर, नबाजी मदने ,प्रगतशील बागायतदार विजय मदने .यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संखयेने उपस्थित होते. यावेळेस प्रास्ताविक विराज मगर यांनी केले .तर राशी सिडसचे टेरिटरी मॅनेजर गोपाळ पाटील यांनी राशी सिडसचया मका बियाणांचा वापर कसा उपयुक्त असतो यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना गोपाळ पाटील यांनी राशी सिडसचया मकेचा r _3414 ह्या वाण मकेच्या उत्पादनांसाठी अत्यंत उपयोगी असुन एकरी 40__45 क्विंटल प्रर्यत उत्पन्न मिळते तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी तसेच मुरघास करण्यासाठी हा वाण अत्यंत उपयोगी ठरतो. हा रोगास सहजासहजी बळी पडत नाही. लष्करी अळीचा प्राश्नदुर्भाव कमी होते. पाणी कमी पडले तरही उत्पन्नात घट होत नाही .यामुळे शेतकऱ्यांनी याच वाणाचा उपयोग करणयाचे आवाहन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना केले. यावेळी राशी कंपनीचे मारकेटींग मॅनेजर सुहास लवटे, महालक्ष्मी कृषी केंद्राचे संचालक सुभाष काळे यांच्यासह कुसमोड, झिंजेवस्ती परिसरातील शेतकरी बांधव मोठया संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते .सुभाष काळे यांनी आभार मानले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















