Wednesday, October 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
October 28, 2026
in west maharashtra
0
चंद्रभागा वाळवंट स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर –  शहरातील चंद्रभागा वाळवंट परिसर स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ ठेवण्याच्या उद्देशाने पंढरपूर नगरपरिषदेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेले विशेष स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न झाले. दि. ७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत एकूण ८५ टन कचरा संकलित करण्यात आला यामध्ये नागरिकांनी नदीपात्रात अर्पण केलेले  वस्त्रे, धार्मिक साहित्य, निर्माल्य व इतर कचरा संकलित करण्यात आला असून आहे.आजच्या स्वच्छता मोहिमेत तब्बल २६ टन कचरा संकलित करण्यात आला.  अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
पंढरपूर नगरपरिषदेसह विविध सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, देशमुख जिम कट्टा ग्रुप, गुजराथी रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अनुलोम सामाजिक संस्था, आपटे उपलप प्रशाला, श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्था, श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि जोगदंड महाराज वारकरी शिक्षण संस्था अशा एकूण एक हजार जणांनी सहभाग घेतला होता.
या अभियानात ह.भ.प. रामभाऊ महाराज राऊत, ह.भ.प. डॉ. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प. राणा महाराज वासकर, ह.भ.प. विष्णू महाराज कबीर, ह.भ.प. ठाकूरबुवा महाराज, ह.भ.प. उखळीकर महाराज, ह.भ.प. भागवत महाराज कबीर, ह.भ.प. ज्ञानेश्वर जोगदंड महाराज आणि ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, स्वयंसेवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी श्रमदान केले.
नगरपरिषदेच्या विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला. नगरसेवक ओंकार जोशी यांच्यासह अनेक नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत योगदान दिले. समाजमाध्यमांवरून या उपक्रमाची माहिती मिळाल्यानंतर कल्याण येथील स्वच्छतादूत केतन वाकडे यांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत श्रमदान केले.
चंद्रभागा वाळवंट परिसरातील कचरा, प्लास्टिक आणि इतर घनकचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला. संकलित कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. या उपक्रमातून सार्वजनिक स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिकमुक्त परिसर आणि पर्यावरण संवर्धनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली असल्याचे ह. भ .प. रामभाऊ महाराज राऊत यांनी सांगितले.
पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र असून, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. चंद्रभागा नदी आणि वाळवंट परिसराला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्याने हा परिसर स्वच्छ व निर्मळ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची आणि भाविकाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘स्वच्छता हीच विठ्ठल सेवा’, ‘श्रमदानातून भक्ती’ आणि ‘सहभागातून स्वच्छता’ या संदेशांतून स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले असल्याचे ह भ प जयवंत महाराज बोधले यांनी सांगितले.
–महेश भंडारकवठेकर २८-१०-२०२६—
दर बुधवारी श्रमदान अभियान
पंढरपूर शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ करण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने दर बुधवारी सकाळी ७.३० वाजता स्वच्छता व श्रमदान अभियान आयोजित करण्यात येते. आजचे श्रमदान हे या अभियानातील चौथे श्रमदान होते.
या अभियानात सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, विविध मंडळे आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक संस्थांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असेही आवाहनही मुख्याधिकारी श्री रोकडे यांनी केले आहे.
Post Views: 6
Previous Post

शेतकऱ्यांनी राशी सिडसच्या मका बियाणांचा वापर करावा _ गोपाळ पाटील

Next Post

उमा महाविद्यालया अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षण 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उमा महाविद्यालया अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षण 

उमा महाविद्यालया अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षण 

ताज्या बातम्या

बीसीसीआय लेव्हल ‘ओ’ प्रशिक्षक परीक्षेत योगेश कोम्पल उत्तीर्ण

बीसीसीआय लेव्हल ‘ओ’ प्रशिक्षक परीक्षेत योगेश कोम्पल उत्तीर्ण

October 28, 2026
शहर नेटबॉल स्पर्धेत बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूलला विजेतेपद

शहर नेटबॉल स्पर्धेत बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूलला विजेतेपद

October 28, 2026
संगमेश्वर कॉलेजच्या मानस गायकवाडला राज्य बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य

संगमेश्वर कॉलेजच्या मानस गायकवाडला राज्य बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य

October 28, 2026

विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थिनीची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड

October 28, 2026

जामगाव येथील ३० एकर ऊसाला अचानक आग

October 28, 2026
लाडकी बहिणयोजनेतून वगळलेल्या राज्यातील नाराज ८५ लाख महिलाना ई के वाय सी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या.!

लाडकी बहिणयोजनेतून वगळलेल्या राज्यातील नाराज ८५ लाख महिलाना ई के वाय सी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या.!

October 28, 2026
कायद्याचे ज्ञान आणि जागरूकता हीच बालकांच्या सुरक्षिततेची गुरुकिल्ली – न्यायाधीश एम. बी. कुडते

कायद्याचे ज्ञान आणि जागरूकता हीच बालकांच्या सुरक्षिततेची गुरुकिल्ली – न्यायाधीश एम. बी. कुडते

October 28, 2026

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा निकेतनची उत्तुंग भरारी! आशुतोष बाबरची राज्यात द्वितीय क्रमांकाची कामगिरी

October 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1430538

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!