सोलापूर – सोलापूर शहरातील नई जिंदगी परिसरातील ४ पानटपरीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि ओला मावा साठा जप्त केला आहे. या कारवाईत चार जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशपाक जब्बार बागवान, फरीद सलीम कुरेशी, मुबीन दावल शेख आणि बाबुलाल शकिल मडकी (सर्व रा. सोलापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मंगळवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:४० वाजण्याच्या सुमारास नई जिंदगी परिसरातील वरील चार आरोपींच्या पानटपरीवर अन्न व औषध प्रशासन सोलापूरचे अधिकारी देशमुख नेम यांनी छापा टाकला. शासनाने बंदी घातलेला प्रतिबंधित सुगंधित तंबाखू, ओला मावा व सुपारी असा एकूण ८ हजार रुपये किमतीचा साठा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवलेला मिळून आला . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ढंगे हे करत आहेत.
Post Views: 13