बार्शी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. २, उपळाई (ठों) ने दैदिप्यमान यश मिळविले आहे.
या परीक्षेसाठी शाळेतील २७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी २६ विद्यार्थी पात्र ठरले. शाळेचा निकाल ९६.२९ टक्के लागला असून हा निकाल बार्शी तालुक्यात अव्वल ठरला आहे.
गुणवत्ता यादीत स्थान मिळवणारे व उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी- मल्हार अनंत सदावर्ते २४६, सर्वज्ञ सतीश वाघ २४६, आरोही संतोष पाटील २४०, दिव्या विलास पांगरे २२८, श्रवण वैजीनाथ देवकर २२६, श्रेया सुधाकर सुतार २२४. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. दिपक वैद्य यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल आणि यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे ठाम आश्वासन अध्यक्ष यांनी दिले.
उपळाई (ठों) शाळेने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांनी मुख्याध्यापक अनिल काळे, वर्गशिक्षिका श्रीमती दिपाली गोरे तसेच सर्व शिक्षकवृंदाचे मनापासून कौतुक केले.
या यशामागे श्रीमती दिपाली गोरे यांचे वर्षभराचे अथक परिश्रम आहेत. त्यांनी एकही दिवसाची सुट्टी न घेता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सोबतच मुख्याध्यापक
अनिल काळे, आनंद घाडगे, रामचंद्र बरचे, प्रभाकर काटे, हरिभाऊ दळवी, श्रीमती वैशाली खुने, श्रीमती बेबीनंदा खडबडे, श्रीमती सुवर्णगौरी शिंदे, श्रीमती मीरा गरड यांनीही मोलाचे सहकार्य केले.
या यशाबद्दल बार्शी तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड, तत्कालीन विस्ताराधिकारी भारत बावकर, केंद्रीय मुख्याध्यापक शिवाजी कांदे, केंद्रप्रमुख श्रीराम आगलावे, माजी केंद्रप्रमुख अरुण तिकटे, धनाजी जाधवर, श्रीमती सिंधू गिलबिले, सरपंच मधुकर वैद्य, उपसरपंच सौ. मीनल ठोंगे, माजी उपसरपंच सुंदरराव पाटील, आण्णासाहेब लुंगसे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सविता भोंग, उपाध्यक्षा सौ. योगिता सदावर्ते व सर्व सदस्य यांनी विद्यार्थी, वर्गशिक्षिका श्रीमती दिपाली गोरे मॅडम आणि संपूर्ण शिक्षकांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी श्रीराम आगलावे, भालचंद्र जामदार,
सचिन ठोंगे, सुधाकर सुतार, विलास पांगरे, सौ. प्रियंका सदावर्ते, सौ. सारिका पाटील, सौ. कोमल पांगरे, सतीश वाघ, भाऊसाहेब माळी, वैजीनाथ देवकर, शिवाजी ठोंगे उपस्थित होते.