सोलापूर – नागेश करजगी ऑर्किड स्कूलचे रिषभ गोचडे व मृण्मयी गायकवाड यांनी शालेय शहर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद पटकाविले.
या कामगिरीवर त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यांना क्रीडा विभाग प्रमुख आनंद लिगाडे, ज्ञानदीप जाधव यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते, स्कूलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, स्कूलच्या मार्गदर्शीका मीना पारखे, प्राचार्या रश्मी कुंभार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
—





















