सोलापूर – पाकणी (ता. उत्तर सोलापूर) येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत 17 वर्षे मुलींच्या अंतिम सामन्यात पाकणीने श्री गणेश विद्यालय बी.बी. दारफळचा 5-2 ने पराभव केला, तर 17 वर्षे मुलांच्या अंतिम सामन्यात सिंहगड पब्लिक स्कूल, पंढरपूरचा 6-2 ने धुव्वा उडवत विजेतेपद पटकावले. दोन्ही संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र झाले. तसेच पाकणीने 14 वर्षाखालील मुलींच्या गटात द्वितीय व मुलांच्या गटात तृतीय क्रमांक संपादला. या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक किशोर गुंड, गोरखनाथ घोडके, श्रीधर देशमुख, नागनाथ लोंढे व अब्दुल चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या संघाचे संस्थेचे सचिव सुबोध शिंदे व मुख्याध्यापक म्हाळप्पा कोकरे, तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, नेटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष खुद्दूस शेख यांनी अभिनंदन केले.
—–




















