Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महामार्ग सुशोभीकरणामुळे पर्यटनाला चालना – नारायण राणे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 14, 2024
in maharashtra
0
महामार्ग सुशोभीकरणामुळे पर्यटनाला चालना – नारायण राणे
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या पर्यटन जिल्ह्याला साजेस काम महामार्ग सुशोभीकरणाच्या माध्यमातून केले जाईल. कोकणची संस्कृती यात प्रतिबिंबित होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज दुपारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाराप येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाला त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र शासन राष्ट्रीय महामार्ग विभाग रत्नागिरी अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या ‘तळगांव ते पत्रादेवी ‘ महामार्ग सुशोभीकरण करणे कार्यक्रमाचे भूमिपूजन केंद्रीय लघु सूक्ष्म व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाराप येथे संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार तथा भाजपचे कुडाळ विधानसभा प्रमुख निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश कार्यकारणी सदस दत्ता सामंत, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, उपअभियंता मुकेश साळुंखे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड, भाजपचे जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष गुणाजी जाधव, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रज्ञा ढवण, जिल्हा सरचिटणीस संजना सावंत,संध्या तेरसे, दीपा लक्ष्मी पडते, झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, तेर्से बांबर्डे सरपंच रामचंद्र परब, हुमरस सरपंच सिताराम तेली, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनेश साळगावकर, आनंद शिरवलकर, राजू राऊळ, मोहन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्यात येणाऱ्या जगभरातील पर्यटकांना आकर्षण वाटावे यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील या महामार्गाच्या टप्प्याचे सुशोभीकरण मंजूर करून घेतले. दिल्लीनंतर आपल्या जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारे महामार्गाचे सुशोभीकरण होणार आहे. हा निसर्ग संपन्न जिल्हा आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावा हाच यामागचा मानस आहे. कारण महामार्ग म्हणजे केवळ प्रवासाचे नव्हे तर जनतेच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ते पुढे म्हणले, केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांचे व आपले संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. मी राज्यात मुख्यमंत्री असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. तर आता आम्ही दोघेही केंद्रात मंत्री आहोत. अशाच एका कॅबिनेट बैठकीनंतर बाहेर पडताना मी त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्ग पूर्ण झाला असून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे असे सुचवले. त्यांनी याबाबत प्रस्ताव देण्यास सांगितले. त्यानंतर आम्ही त्वरित प्रस्ताव सादर केला व त्या प्रस्तावाला त्यांनीही लगेचच मान्यता दिली.दोन दिवसांपूर्वीच त्यांना भेटून या कामाला मंजुरीही घेतली. त्यामुळेच आता हे काम जलद गतीने पूर्ण होणार असून जिल्ह्याला एक नवे रूप प्राप्त होणार आहे यासाठी मी नितीन गडकरी यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले.

मुंबई गोवा महामार्ग अन्य जिल्ह्यात रखडलेला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र त्याचे काम आम्ही त्वरित पूर्ण करून घेतले. मात्र येथील लोकांना त्याचे अप्रूप वाटत नाही. ‘केल्यानी तर काय झाला ‘अशीच मानसिकता येथील लोकांची आहे. महामार्गाचे फार मोठे महत्त्व आहे. महामार्गामुळे वेळेची बचत होईल. मात्र बचत झालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा. उद्या तुम्हाला एखादा उद्योग व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही करत असलेल्या उद्योग व्यवसायातील उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी महामार्गाचे फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळे मानसिकता बदला व विकासाला साथ द्या असेही त्यांनी सांगितले.

मी महसूल मंत्री असताना सावंतवाडीतील शासकीय सिंधू महोत्सव कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला. त्यानंतर या जिल्ह्यात अनेक प्रकल्प आणले त्यातील काही मार्गी लागले तर काहींना विरोध झाला. सी वर्ल्ड, डिस्नेलँड या सारख्या प्रकल्पांना विरोध झाला. मालवण येथील ज्या भागात शेती होत नाही साधे गवतही उगवत नाही अशा भागात सी वर्ल्डसाठी भूसंपादन होत असताना त्याला विरोध केला गेला. मालवण येथेच माळरानावर डिस्नेलँड सारखा प्रकल्प होणार होता. तत्कालीन सचिव अरुण बोंगिरवार यांची या प्रकल्पासाठी नेमणूक केली होती. मात्र भूसंपादनाला विरोध झाल्याने तोही प्रकल्प रखडला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर रोषणाई करायची होती. मात्र, येथील लोकांची मानसिकता नसल्याने अनेक प्रकल्प मार्गी लागले नाहीत. ते मार्गे लागले असते तर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न चार लाखाहून अधिक झाले असते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आपल्याकडे केवळ विरोधासाठी विरोध हीच मानसिकता आहे. आजच्या या चांगल्या कार्यक्रमाला कोणीही विरोधक उपस्थित राहिले नाहीत. कारण त्यांना विकासाचा दृष्टिकोन नाही. ते कोणताही विकास करू शकले नाहीत. साधी बालवाडी, रस्ता किंवा पूलही ते बांधू शकले नाहीत. त्यामुळे भविष्यात या महामार्गावरून फिरताना किमान नारायणाचं म्हणजे देवाचं नाव तरी घ्या, असा टोलाही त्यांनी लगावला.

तळगाव ते पत्रादेवी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या टप्प्याचे सुशोभीकरण होत आहे. या कामात जिल्ह्याच्या दोन्ही प्रवेशद्वारावर आकर्षक अशा कमानी होणार आहेत. या स्वागताच्या कमानीवर हत्तींच्या प्रतिमा असाव्यात कारण हत्तींना आपण गणपतीचे स्वरूप मानतो. तसेच विविध ठिकाणी सिंधुदुर्गात आढळणारे विविध प्राणी, पक्षी यांच्या प्रतिमा उभारण्यात याव्यात. या महामार्गाच्या दुभाजकावर तसेच रस्त्याच्या बाजूला उन्हात व पावसात बारा महिने टिकतील अशीच पण आकर्षक झाडे लावण्यात यावीत. त्याचबरोबर या सुशोभीकरण कामाची प्रत्येक डिझाईन मला दाखवूनच ती फायनल करण्यात यावी अशा सूचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांना केल्या. तुमच्या नावात लक्ष्मी आहे त्यामुळे पैशांची काळजी करू नका आवश्यक असलेला सर्व निधी पुरविला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांचा पायगुण चांगला म्हणजेच त्यांचा दृष्टिकोन सकारात्मक असल्याचे सांगातानाच पत्रकारांनीही चांगल्या कामाचं जनमानसात प्रबोधन करावं असेही त्यांनी स्पष्ट केले.

Post Views: 46
Previous Post

HEADLINE – सोलापूर तरुण भारत – महत्वाच्या घडामोडी

Next Post

सैन्य भरतीसाठी (अग्नीवीर) इच्छुक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सैन्य भरतीसाठी (अग्नीवीर) इच्छुक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

सैन्य भरतीसाठी (अग्नीवीर) इच्छुक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001907

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!