श्री रामलिंगेश्वर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त प्रशालेतील शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी समवेत योग दिन साजरा करण्यात आला.
योग ही भारतीयांची प्राचीनतम ओळख आहे.नियमितपणे योग केल्याने शरीर प्रफुल्लित आणि मन ताजेतवाने राहते.आयुर्मान वाढते .रोगप्रतिकारक शक्ती वाढते.होकारात्मक विचारांची प्रगल्भता वाढते .असे विचार
प्रा.अमर पाटील,प्रा. नागराज पाटील यांनी मांडले. जीवनात योगाचे महत्त्व व त्याची गरज या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याचबरोबर महत्त्वाचे योगासन करून प्रात्यक्षिक विद्यार्थ्याकडून करून घेण्यात आले. तसेच त्याचे नियमित सराव करण्याचे आवाहन करण्यात आले.
श्री रामलिंगेश्वर शिक्षण संकुलाच्या निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी योगाचा सराव केल्यास जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 3