शंकरनगर येथील महाशिवरात्री यात्रा समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रावण मासाच्या समाप्ती निमित्त सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता शंकरनगर- अकलूज ता. माळशिरस येथील श्री शिवपार्वती मंदिरात महाआरती आयोजन केले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष श्री.जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांनी दिली. श्रावण महिन्यात शिवपार्वती मंदिरात अखंड नामजप सोहळा सुरू आहे. मंदिर परिसरात नेहमीच सर्वधर्मीय भाविकांची दर्शनास गर्दी असते. श्रावणाच्या दर सोमवारी मंदिरात रुद्राभिषेक, आरती, धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे वाटप केले जाते श्रावण महिन्यानिमित्त पैलवान साठी दोन दिवस नागपंचमीचा . भव्य उत्सव व खेळ तसेच शिवलीला अमृत या ग्रंथाचे सामुदायिक वाचन करण्यात आले यामध्ये एक हजार महिलांनी सहभाग घेतला होता मंदिराचा भव्य परिसर व आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे मंदिर अतिशय सुंदर दिसते दररोज भाविकांची मोठी गर्दी असते या महाआरतीसाठी भाविकांनी सहकुटुंब

उपस्थित रहावे असे आवाहन ट्रस्टच्या सदस्य कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांनी केले आहे
Post Views: 14