सोलापूर – पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे व स्मिता योगेश जाधव यांच्या प्रचारार्थ सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांनी शिक्षक व पदवीधर मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या. यावेळी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करत मतदारांशी संवाद साधला. या प्रचार मोहिमेला मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
आमदार विजय देशमुख यांचा साधेपणा अन् मतदारांचा आपुलकीचा पाहुणचार हे या भेटीगाठींचे विशेष आकर्षण ठरले. घरोघरी पोहोचलेल्या आमदार विजय देशमुख यांचे मतदारांनी आपुलकीने व आदरातिथ्याने स्वागत केले. अनेकांनी चहापान व अल्पोपहाराचा आग्रह धरला. आमदार देशमुख यांनीही शक्य त्या ठिकाणी मतदारांच्या आग्रहाचा मान राखत चहापान स्वीकारले. या अनौपचारिक भेटींमध्ये शिक्षक व पदवीधर मतदारांशी मनमोकळ्या गप्पा रंगल्या. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या विजयासाठी सकारात्मक चर्चा झाली.
या भेटीगाठींप्रसंगी राजशेखर हिरेहब्बू, नगरसेवक अमर पुदाले, नगरसेवक प्रविण दर्गोपाटील, अनंतकुमार ऊर्फ बिपीन धुम्मा, प्रसाद कुलकर्णी, बसवराज अंकुशे, योगीराज भोगडे, ओंकार भोगडे, राजेंद्र नाशिककर, शशांक खुणे, सिद्धाराम भेरुपाटील, चंद्रकांत वाकडे, तम्मा कल्याणशेट्टी, अरविंद झगडे, अभिषेक मेंगाणे आदी उपस्थित होते.


















