बार्शी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्यावतीने आयोजित आंतरमहाविद्यालयीन ज्युदो स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले. विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत महाविद्यालयाच्या खेळाडूंनी विविध वजन गटांत पदकांची कमाई करत महाविद्यालयाच्या क्रीडा परंपरेत मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेत करण ढाणे यांनी ८१ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णयश संपादन केले. याच वजन गटात बाळासाहेब दळवी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच ९० किलो वजन गटात स्वामीसमर्थ माळी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, ६६ किलो वजन गटात सागर खराडे यांनी द्वितीय क्रमांक, तर ७३ किलो वजन गटात रोहन माळी यांनी तृतीय क्रमांक मिळवून यशात भर घातली.
खेळाडूंच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, कार्यकारिणी संचालक तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. यावेळी संतोष कवडे, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही यशस्वी खेळाडूंचे कौतुक केले.
या खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. हरिदास बारसकर, डॉ. विजयानंद निंबाळकर व डॉ. रामहरी नागटिळक यांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 12