सोलापूर – दक्षिण सोलापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत सर्व विभागप्रमुखांनी कार्यालयीन कामकाञाच्या वेळेत कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागातील नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी विभागप्रमुख व अधिकार्यांनी कार्यालय सोडून जाऊ नये, अशी सूचना दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती संदिप टेळे यांनी दिली आहे. ‘दैनिक तरूण भारत’ने ‘बालविकास प्रकल्प अधिकार्यांच्या कार्यालयातील दांडी’बाबत बातमी प्रसिन्द करताच सभापती टेळे व गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन सूचना दिली.

दक्षिणचे बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले हे कार्यालयात उपस्थित नसल्याने पालक व अंगणवाडी सेविकांच्या तक्रारीवरुन ‘दैनिक तरूण भारत’ने बातमी प्रसिध्द करून सभापती टेळे यांचे अधिकारी व विभाग प्रमुखांच्रा गैरहजेरी बद्दल भूमिका गुलदस्त्यात असल्याचे सांगितल्यानंतर सभाफती टेळे यांनी तात्काळ विभागप्रमुखांना सूचना दिल्या आहेत.
चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतरावरून लाभार्थी व नागरीक पंचायत समितीच्या अधिकार्यांना भेटण्यासाठी येतात. मात्र पंचायत समितीमधील अधिकारी मिटींग व बैठकांच्या नावे जिल्हा परिषद आवारात व अन्यत्र वावरताना दिसतात. त्यामुळे नागरीकांना आर्थिक भुर्दंड सहन करून हेलपाटे मारावे लागते. याबाबत वरीष्ठांकडे तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळविताना समस्या येत आहेत. याबाबत सभापती टेळे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी सर्व अधिकार्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत, सोमनाथ पटणे व औरादचे माजी सरपंच शांतकुमार गडदे आदी उपस्थित होते.
…..
चौकट
…
दक्षिणमधील नागरीक व लाभार्थी पंचायत समितीला आल्यानंतर अधिकारी भेटत नाहीत. त्यामुळे लाभार्थी व नागरीकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे. म्हणून गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुखांना कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याबाबत सूचना दिली आहे.
संदिप टेळे, सभापती , दक्षिण सोलापूर
















