मोडनिंब – (ता.माढा) येथे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार (दि. ७) रोजी मोडनिंब शहर बंदची हाक देण्यात आली होती. या आवाहनाला व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला. बंद बाबतच्या आवाहनानुसार शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी आपापली दुकाने व व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवत सहभाग नोंदविला.दवाखाने आणि मेडिकल यांसारख्या अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या. अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण मोडनिंब शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे नेहमी गजबजलेली बाजारपेठ आणि मुख्य रस्ते दिवसभर शांत दिसत होते.
Post Views: 5