सोलापूर – शेतातील टोमॅटो काढताना सर्पदंश झालेल्या मुंडेवाडी येथील 12 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज गुरुवारी सकाळी 7 वाजता मृत्यू झाला.
आयेशा आसिफ नदाफ (वय 12 वर्षे रा.मुंडेवाडी ता.पंढरपू ) असे मयत झालेल्या मुलीची नाव आहे.ती रविवार 25 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मुंडेवाडी येथील शेतात टोमॅटो आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याच्या डाव्या पायात सापाने चावा घेतला होता.तिला पंढरपूर येथे प्राथमिक उपचार करून वडिलांनी येथील शासकीय रुग्णालयात रात्री अकरा वाजता दाखल केले असता तिचा उपचारा दरम्यान आज गुरुवारी सकाळी मृत्यू झाला.
मयत आयशा पाचवी इयत्तेत शिकण्यास होती. तिचे वडील आसिफ नदाफ हे वाहन चालक आहेत. तिच्या पश्चात आई, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. चिमुकलीच्या अकाली मृत्यूने घरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Post Views: 6