माळशिरस – गोदबा पाटील प्रतिष्ठाण संचालित कुस्तीप्रशिक्षण केंद्र, खुडूसचा मल्ल पै. हनुमंत जाधव यांची जागतिक कुस्ती स्पर्धसाठी निवड झाली आहे . त्याच बरोबर कु राजेश्वरी महादेव ठवरे हिची नॅशनल स्पर्धत ६१ वजन गटात कास्य पदाची कमाई केली असून तिची खेलो इंडिया स्पर्धसाठी निवड झाली आहे . या स्पर्धा लखनो ( उत्तर प्रदेश ) या ठिकाणी झाल्या होत्या
पै. हनुमंत राजेंद्र जाधव 45 किलो वजन गटात U 17 , लखनऊ (उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या , वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत त्याने .सूर्य फोगट दिल्ली 0.10 , वंश हरियाणा 4.12 , व फायनल कुस्ती साहिल हरियाणा 6.10 या राज्यातील मल्लांवर विजय संपादन करून आपले नाव जागतिक स्तरावर कोरले आहे
या उल्लेखनीय यशामुळे त्यांची अझरबैजान (बाकू) या देशात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या दैदिप्यमान यशाबद्दल पालकमंत्री ना . जयकुमार गोरे माजी आमदार राम सातपुते श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन शेषागिरीराव . विक्रमसिंह शिंदे श्रीमंत तांदुळकर जिल्हा परिषद कृषी सभापती संजय पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .
गोदबा पाटील कुस्ती केंद्रात सुमारे दोनशे मल्ल सराव करतात अनेक मल्लानी राज्यस्तरीय व देशपातळीवर कामगिरी केली आहे . ग्रामीण भागातील कुस्ती केंद्र इतरांना प्रेरणादायी ठरत आहे पैं हनुमंत जाधव व कु राजेश्वरी महादेव ठवरे यांना एनआयएस कुस्ती कोच पै. महादेव ठवरे कोच बापूराव ठवरे. किरण मोरे कुस्ती कोच सागर वाघ कुस्ती कोच तुषार झंजे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे .
चौकट
पै .हनुमंत जाधव हा मल्ल चांदज ता . माढा येथील असून तो खुडूस येथे गोदबा पाटील प्रशिक्षण केंद्रात सराव करतो . तो . अत्यंत गरीब कुंटुबातील आहे आई वडिल मोलमजुरी करून त्याची खुराकाची व्यवस्था करतात याची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी होत आहे माढ्याचे विक्रमसिंह शिंदे यांनी सत्कार करून ५५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.
Post Views: 11