सोलापूर : शहर पोलीस आयुक्तालयातील अंतर्गत बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक असे एकूण ३८ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मुदतवाढ किंवा विनंती अर्जांबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासो सावंत, मनोज मोरे, विजय बनसुडे, यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे यांची एमआयडीसी (विमानतळ सुरक्षा) येथे बदली झाली आहे.
यात सपोनि शितलकुमार गायकवाड, सपोनि जोत्स्ना भांबिष्टे, सपोनि गणेश इंगळे, सपोनि स्वाती येळे, पोउपनि वर्षाराणी सुतार, पोउपनि सुरज कुतवळ, प्रकाश बनसोडे, पोउपनि नवनाथ साखरे यांना एकवर्ष मुदतवाढ देण्यात आली. सपोनि सारिका जगताप यांची सदर बझार पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. शिवाय रमेश कांबळे यांची शहर वाहतूक शाखेतून शहर दक्षिण वाहतूक शाखा, श्रीकांत पाटोळे, राधा जेऊघाले यांची फौजदार चावडी पोलिस ठाणे येथून जोडभावी पेठ, जोडभावीचे सागर बामणे यांची शहर दक्षिण वाहतूक शाखा, संतोष येडे यांची जेलरोड, नागेश येळे, लक्ष्मण पाटील, अशोक तरंगे यांची एमआयडीसी, महेंद्र गाढवे यांची आर्थिक गुन्हे शाखा, नागेश येणपे यांची सदर बाझार, नागनाथ कानडे यांची नियंत्रण कक्ष, नागेश इंगळे यांची एमआयडीसी, विक्रम रजपूत यांची पोलिस उपायुक्त परिमंडळ यांचे वाचक, धनंजय जाधव यांचे प्रशिक्षण कक्ष, बालाजी मस्के यांची आर्थिक गुन्हे शाखा, मनाेज बागल यांची विजापूर नाका येथे बदली करण्यात आली आहे.
चौकट –
त्याचप्रमाणे शहरातील ७ पोलीस अधिकाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात आले आहेत. त्यात फौजदार संतोष कुलकर्णी (शवाशा द. ते अर्ज शाखा), सहाय्यक पोलीस निरीक्षक राधिका केंद्रे (एमआयडीसी ते फौजदार चावडी पो. ठाणे), सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड (जोडभावी पेठ ते विजापूर नाका पो. ठाणे) येथे विनंती बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ आपला नवीन कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.