सोलापूर – धावत्या ट्रकला अपघात झाल्याने एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजता अक्कलकोट – अफजलपुर मार्गावर सिन्नुर गावाजवळ घडली .
रवी सुधाकर गवळी ( वय 38 वर्ष , रा. अहिल्यानगर ,मुळेगाव सोलापूर) असे त्या मयत ट्रक चालकाचे नाव आहे . तो बुधवारी सायंकाळी सात वाजता अफजलपुर कडून अक्कलकोट कडे एका ट्रक मधून येत असताना वाटेत सिन्नुर गावाजवळ ट्रकला अपघात झाला . यात गंभीर जखमी होऊन तो जागेवरच मयत झाला .दरम्यान नातेवाईक अनिकेत यांनी रवी गवळी यास येथील शासकीय रुग्णालयात मध्यरात्री दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .मयत रवी हा ट्रक चालक असून तो मित्राबरोबर फिरायला जातो म्हणून घरात सांगून गेला होता . त्याच्या पक्षात आई वडील , पत्नी व तीन मुली असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .