सोलापूर – आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजन पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह ५४ जणांनी गुरुवारी जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले, तर १०८ जणांनी अर्ज खरेदी केले. आतापर्यंत ५१६ जणांनी अर्ज नेले असून ६९ अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली आहे.
आमदार सुभाष देशमुख, मनीष देशमुख, शहाजी पवार, अमोल शिंदे, अस्मिता गायकवाड, रोहिणी तडवळकर यांनी नागरी सहकारी बँका पतसंस्था गटातून अर्ज दाखल केला आहे. रणजितसिंह शिंदेंनी कृषी पणन, सोसायटी, दूध संस्था, नागरी सहकारी बँक व पतसंस्था अशा चार मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे. माजी आमदार राजन पाटील आणि बाळराजे पाटील यांनी सोसायटीमधून तर अजिंक्यराणा पाटील यांनी कृषी पणन, इतर मागासवर्गीय आणि नागरी सहकारी बँका पतसंस्था गटातून अर्ज भरला आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी अक्कलकोट आणि आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र रणवीर राऊत यांनी बार्शी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी ओबीसी मतदारसंघातून अर्ज दाखला केला आहे. प्रकाश पाटील आणि भारती शिवदारे यांचे अर्ज यांनी नागरी बँका पतसंस्था मतदारसंघातून दखल झाले आहेत.
दुसरीकडे गुरुवारी आमदार राजेंद्र राऊत, रूपमती दीपक साळुंखे पाटील, सूर्योदित्य दीपक साळुंखे,मिलन कल्यानशेट्टी, संगीता कल्याणराव काळे,रणवीर राऊत, मुकुंद परिचारक, शिवाजी कांबळे, उमेश परिचारक,मीनल गणपत साठे, गणपतराव साठे, संजय कोकाटे, भारत शिंदे यांच्यासह एकूण १०८ जणांनी अर्ज घेतले. आज यातील अनेक जण अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. मात्र आमदार पुत्र रणजीत राऊत, मनीष देशमुख यांच्यासह माजी आमदारांचे पुत्र रणजितसिंह शिंदे, बाळराजे आणि अजिंक्यराणा पाटील यांनीही अर्ज दाखल केल्याने सगळ्यांच्या नजरा उंचावल्या आहेत.



















