पिलीव – सोलापूर जिल्ह्यात अनेक काॅलेज व खाजगी कोचिंग क्लासेस यांच्यामध्ये साटेलोटे आहे हे अधोरेखीत झाले आहे .दोन्ही मिळुन सध्या शैक्षणिक धोरण चालवित आहेत. काॅलेज मध्ये प्रवेश घ्यायचा फी भरायची व फक्त परीक्षेसाठी काॅलेज मध्ये जायचे वर्षभर खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये तयारी ना काॅलेज मध्ये हजर शिकण्यासाठी, प्रॅक्टीकलसाठी मग वर्षभर काॅलेज बोगस हजेरी लावणार अशी विदारक स्थिती सध्या सर्वत्र पाहावयास मिळत आहे .यासाठी शासनाने कठोर पाऊल उचलले आहे .काॅलेज मध्ये दररोज बायोमेट्रिक हजेरीसह 75 टक्के काॅलेज मध्ये हजेरी अन्यथा परीक्षेस बसताच येणार नाही .याची शासनाने प्रभावीपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे .तरच याला कुठे तरी चाप बसेल अन्यथा पहीले पाढे पंचावन्न अशी परिस्थिती आहे.काॅलेजला फी भरुन प्रवेश घ्यायचा व फक्त परीक्षेसाठीच काॅलेज मध्ये जायचे मग खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये लाखो रुपये फी भरुन एम.एच सि ईटी, निट, जेईई अश्या परीक्षेची तयारी करायची यामुळे काॅलेज मध्ये विद्यार्थ्यांचा अक्षरश शुकशुकाट पाहावयास मिळत आहे.शहरात हे फयाड आहेच पण सध्या ग्रामीण भागात सुद्धा सर्रास हे प्रकार चालु आहेत. अनेक काॅलेज व खाजगी कोचिंग क्लासेस यांच्यामध्ये फार मोठी आर्थिक देवाणघेवाण करुन विद्यार्थी काॅलेज ला दिले जातात पर विद्यार्थी खाजगी कोचिंग क्लासेस वाले काॅलेजला पैसे देतात यामुळे दोघांनाही चांगला आर्थिक लाभ होतो .हा एक शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रासारखया पवित्र क्षेत्रात पैसे कमावण्याचा गोरस धंदा झाला आहे .शासनाने यावर वेळीच कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे .सोलापूर जिल्ह्य़ात खाजगी कोचिंग क्लासेस व काॅलेज साटेलोटे यामध्ये परीक्षा केंद्र तेच काॅलेज अक्षरश काॅप्यांचा सुळसुळाट पाहावयास मिळत आहे .निकाल चांगला लावून बॅनरबाजी करुन विद्यार्थी पालकांना फसविले जात आहे .यामुळे पेपर फुटीसारखे प्रकार घडत आहेत. या दोघांच्या साटयालोटयात विद्यार्थ्यांना गैरमार्गाने चांगले मार्क्स मिळवुन दिले जात आहे .
चौकट _ शिक्षण विभागाने बायोमेट्रिक हजेरीसह, वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे, अचानक महाविद्यालयांना भेटी देऊन पट पडताळणी करणे, जेवढी मान्यता तेवढेच विद्यार्थी याची पाहणी करणे,
काॅलेजचा मान्यता व यु डायस क्रमांक दर्शनी भागात लावणे, ज्या काॅलेजचे खाजगी कोचिंग क्लासेस बर साटेलोटे आहे त्याची मान्यता रद्द करणे अशी कडक व प्रभावी अंमलबजावणी केल्याशिवाय यामध्ये बदल होणार नाही. चौकट _ खाजगी कोचिंग क्लासेस व काॅलेज यांच्यामधील साटेलोटे दुर्दैवी आहे .यासाठी अकरावी व बारावी अभ्यासक्रमाचा परीक्षेसाठी समावेश करावा .जेणेकरून दोन्ही वर्षाला महत्त्व राहील _ पालक जयंत गोरे.
Post Views: 11