अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी(अ) या छोट्याशा गावातून केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत २७९ वा क्रमांक पटकावून आयपीएस प्रवेश मिळवलेल्या श्री प्रवीण चंद्रकांत स्वामी यांचे संस्था अध्यक्ष प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार, शशिकांत स्वामी (इंजिनीयर) संस्था संचालक काशिनाथ बिराजदार, शिवराज बिराजदार, निवृत्त ग्राम विकास अधिकारी श्रीशैल स्वामी व सौ.संगीता श्रीशैल स्वामी तसेच शिवलिंगप्पा वंगे यांच्या उपस्थितीत सत्कार करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी प्रवीण स्वामी सत्कार बाबत आपले विचार मांडताना म्हणाले की,यश संपादन करण्याकरिता ग्रामीण, शहरी, श्रीमंत, गरीब, महागडे क्लासेस यांची आवश्यकता नसून याकरिता जिद्द, सातत्य व नियोजनाच्या जोरावर देशातील सर्वोच्च स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवता येते. त्याकरिता मानसिक तयारी व कष्टाची गरज असल्याचे भावना व्यक्त केली. तसेच शालेय परिसरातील निसर्गरम्य वातावरणाची कौतुक करून इथे शिक्षण घेणारे विद्यार्थी भाग्यवान आहेत. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात आपल्या उज्वल भविष्याची पाया भक्कम करण्याची संधी मिळाली. या संधीचे अपार कष्ट करून आपल्या आई-वडिलांचे व गुरुजनांचे नावलौकिक करावे असे प्रतिपादन केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी श्रीशैल स्वामी शिवलिंप्पा वंगे प्रा.सावित्री बिराजदार पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिले.
अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डॉ.भीमाशंकर बिराजदार सर म्हणाले की,प्रवीण स्वामी हे आमच्या गुरुस्थानी असून आमच्या शेजारील गावातील आहेत. त्यांच्या यश हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण हालहळ्ळी (अ) पंचक्रोशी आणि अक्कलकोट तालुक्यासाठी अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण असल्याचे मत व्यक्त केले. त्याचबरोबर प्रवीण स्वामी यांचे यशाचे कौतुक करून त्यांच्या प्रमाणे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कष्ट घेऊन यश संपादन करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य सुधीर सोनकवडे यांनी केले यावेळी गुंडू स्वामी, नागय्या स्वामी, डॉ.मल्लय्या स्वामी,प्रशालेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार महेश पट्टणशेट्टी यांनी मानले.
Post Views: 32