सोलापूर – पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानम येथे शुक्रवार २८ ऑगस्ट पासून पविञोत्सवम् कार्यक्रमास सुरुवात झाली. मंगळवार रोजी सकाळी ६ , वा. “श्री”चे उत्सवमुर्ती अभिषेक व ९.३० वाजता श्री सुदर्शन यज्ञ तिरुमला तिरुपती देवस्थान येथून आलेल्या ब्रह्मवृंद त्यांच्या हस्ते शास्ञोक्त विधीवत अभिषेक व होमहवन कार्यक्रम पार पाडला. दि. १ संप्टेबर रोजी सांय. ६.३० होमहवन, स्वागत समारंभ, कार्यक्रमानंतर उत्सव मुर्तीना सुंदर मनमोहक असा सजवुन पालखीने मंदिर प्रदक्षिणा करण्यात आले विविध फुलांनी सजविलेल्या कल्याण मंडपमध्ये तिरुमला येथुन आलेले वेदपंडित श्री रामशेषु स्वामी यांनी वेद मंञोच्छारात डोळ्याचे पारणे फेडावे असे श्री श्रीदेवी भुदेवी समेत श्री वेंकटेश्वर स्वामी दिव्य कल्याणोत्सवम् कार्यक्रम दक्षिणात्य मंगल वाद्यात विधीवत पार पडला यावेळी कल्याणकर्ते यांच्यासह भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती .
कल्याणोत्सवम् कार्यक्रमा नंतर रात्री नऊ वाजता तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास मंदिर समितीचे अध्यक्ष रायलिंग आडम, श्रीनिवास बोध्दुल, व्यंकटेश चिलका, राजेशम येमुल, गोविंद बुरा, श्रीनिवास गाली, व्यवस्थापक राजदिगबंर रापेल्ली अशोक चिन्नी व श्रीचे पालखी सेवक यांच्यासह भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.





















