सोलापूर – कोल्हापूर येथे झालेल्या 13व्या स्टुडंट्स ऑलिंपिक असोसिएशन राज्य मैदानी स्पर्धेत रनिंग, गोळा फेक व थाळी फेक स्पर्धेमध्ये रिनाती इंग्लिश मीडियम स्कूल चपळगांव (अक्कलकोट) येथील विद्यार्थ्यांनी 3 सुवर्ण, 3 कास्य अशी ६ पदकांची चमकदार कामगिरी केली.
यशस्वी विद्यार्थ्यांचे ऑक्टोंबरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक विवेक मिस्कीन व सहशिक्षक अमोल भरमशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. रिनाती स्कूलचे चेअरमन -उमेश पाटील , व्यवस्थापक सुरेश सुरवसे व तसेच मुख्याध्यापिका अनिता मोरे यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कामगिरी : 100 मी धावणे : श्रेया वर्दे (कास्य), वैष्णवी राजगुरू (कास्य), स्वरांजली वरडे (सहभाग).
थाळी फेक : प्रणाली माने (सुवर्ण) यश जाधव (सुवर्ण) चैतन्य बिराजदार (सहभाग).
गोळा फेक : प्रणाली माने (सुवर्ण) यश जाधव (कास्य).
———-
Post Views: 19