सोलापूर – शालेय शहर शूटिंगबॉल स्पर्धेत बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजने १७ वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. 19 वर्षाखालील मुलींच्या गटात मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सुभाष उद्यान येथे झालेल्या स्पर्धेत त्यांनी ही कामगिरी केली. या विजयी संघास क्रीडा शिक्षिका अनिसा नालबंद, सईदा दारूवाले, वसीम बागवान व शहबाज कुरेशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे प्राचार्या तहसीना शेख व आरिफ पठाण आदींनी अभिनंदन केले.
विजयी संघ : मुस्कान बागवान, खतीजा पटेल , जिया कौसर धवलगी, सॉलेहा कोकटनुर, बीबी आयशा मनीयार , झिकरा ताबोळी, रुबीना हलियाल, तसलीम शेख, सोबीया सय्यद, आशिया बागवान, बीबी मरियन मसूद , आयशा उस्ताद.
























