पंढरपूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अंतर्गत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय,नातेपुते येथे नुकत्याच आयोजित आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूरच्या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थी कुमार देवर्श लाडे याने उत्कृष्ट कामगिरी करत ५५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
देवर्श यांने जिद्द, मेहनत, शिस्त आणि उत्कृष्ट खेळभावनेच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी कौतुक केले. या यशासाठी महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख प्रा. अनिल जाधव, प्रा. शिवाजी पवार, प्रा. महेश झाडे व प्रा. नागनाथ खांडेकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देवर्श चे अभिनंदन केले. जानेवारी २०२७ मध्ये चंदीगड येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ कुस्ती या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाला विशेष ऊर्जा मिळाली आहे.
देवर्श च्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Post Views: 9