पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे इस्लाम धर्माचे संस्थापक व तमाम मुस्लिम बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त माळशिरस तालुक्यातील पिलीव, झिंजेवस्ती व परिसरातील समाजबांधवांनी विविध उपक्रम राबवून मोहम्मद पैगंबर जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी जामा मशीद वक्फ संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे धार्मिक सम्मेलन घेऊन महिलांना धार्मिक प्रवचनात इस्लाम धर्म व कुराणाचे मुस्लिम धर्मीयांमध्ये असलेले महत्त्वाचे स्थान आचार विचार राहणीमान धार्मिक कार्यक्रम नमाज पठण, महिलांच्यासाठी व सर्वसामान्य व मुस्लिमांना केलेला मुस्लिम कायदा याविषयी अकलूज येथील धार्मिक प्रवचनकार यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये कुराणातील प्रसंग उदाहरणे देऊन कूराणाचे महत्त्व पटवून सांगितले. त्यानंतर महिलांच्यासाठी विशेष स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्यानंतर शुक्रवार दिनांक 4.सप्टेंबर रोजी मोहम्मद पैगंबर यांचे धार्मिक स्थळ असलेल्या व श्रद्धास्थान असलेल्या मदिना स्थित प्रतिकृतीच्या चित्ररथाची तयार केलेल्या प्रतिकृतीची भव्य स्वरूपात वाजत गाजत हातात हिरवे झेंडे ,तिरंगी झेंडे धारक घेऊन कार्यकर्ते तालावर नाचत असलेले दिसत होते यावेळी कुराणातील संदर्भिय धार्मिक भजने गीते म्हणत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी त हिरव्या रंगाच्या झेंड्या बरोबर तिरंगे झेंडे घेऊन हातवारे करून कार्यकर्ते सामुहिक रित्या नाचत होते यावेळी दोन हत्ती चा मिरवणुकीत समावेश होता ,पिलीव बाजारपेठेतुन फुलांची उधळण करीत हिंदू_ मुस्लिम कार्यकर्त्यांच्या वतीने मिरवणुकीत सहभागी असणाऱ्या समाज बांधवांना गावातील काही हिंदू समाज ,सामाजिक संघटना संग्राम राजे प्रतिष्ठान यांच्यावतीने लाडू सरबत पाण्याच्या बाटल्या पेढे वाटण्यात आल्या यावेळी रामचंद्र नाना कोळी ,विजयसिंग रजपूत ,नाना मदने, समशेरसिंग रजपूत ,मोहसिन शेख ,तानाजी लोखंडे ,सोहेल बागवान ,लक्ष्मण काळे यांनी पेढे तसेच लाडुचे वाटप करण्यात आले.
यावेळी जामा मशीद आंधळकर चौक ,अल हुसैनी मशीद सारवान गल्ली ,मदरसा मशीद एसटी स्टँड यांच्यावतीने , आंधळकर चौक चौकातील जामा मशीद वक्फ संस्थेचे सचिव नजीर मुलाणी ,आरिफखान पठाण मौलाना ,मुजमिल तांबोळी, अकबर मुजावर ,रहीम मुलाणी जाफर मुलाणी ,हुसेन मुलाणी, अजिज मुलाणी ,मुन्ना मुलाणी, सलीम मुलाणी, ताहेर मुजावर, सिकंदर मुजावर, शब्बीर मुजावर, शब्बीर मुलांणी, अरमान शेख, बाबा सय्यद सद्दाम काझी अमीर शेख, अमन सय्यद ,जीशान शेख साबीर सय्यद ,राज पठाण, जुबेर पठाण ,हुसेन शेख ,इमरान शेख आसिफ पठाण, जहीर पठाण सैफ पठाण ,समीनखान पठाण वाहिद सय्यद ,शोएब मुलाणी आदी सर्व कार्यकर्त्यांनी मिरवणूक यशस्वी होण्यासाठी सहभाग नोंदवून परिश्रम घेतले
तसेच पोलीस उपअधीक्षक विशाल नवले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शंकर मरळे, नितीन लोखंडे ,मन्सूर नदाफ यांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीची मिरवणूक शांततेच्या वातावरणात संपन्न झाली
Post Views: 7