अक्कलकोट – मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी अक्कलकोट सोलापूर राजमार्गावर सकल मराठा संयोजक अमोल राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सोलापूर ,कर्नाटक आणि मराठवाड्याकडे जाणाऱ्या वाहनाच्या तीन किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे या आग्रही मागणीसाठी उड्डाणपूलासह पाच प्रमुख मार्ग एकाच वेळी रोखण्यात आले होते.
युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता.
याप्रसंगी नगरसेवक संजय मोरे (मैंदर्गी) शहर शिवसेनाप्रमुख योगेश पवार , शिवप्रतिष्ठानचे वरूण शेळके, गोपीचंद लोंढे,वंदना टोणपे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सकल मराठा समाज संयोजक अमोल राजे भोसले , सुरेश सूर्यवंशी, बाबासाहेब निंबाळकर, प्रवीण घाटगे, तम्मा शेळके, मनोज निकम, अण्णासाहेब सुरवसे, सुधाकर गोंडाळ,प्रथमेश पवार, बालाजी पाटील,आतिष पवार, महेश दणके ,योगेश पवार, प्रथमेश पवार, वैभव मोरे, शितल फुटाणे, दयानंद काजळे, गोविंद शिंदे, राजाभाऊ शिंदे, भरत राजेगावकर, अक्षय मोरे, आकाश शिंदे, सरपंच नितीन मोरे, सरपंच दिलीप कदम, सरपंच राम मातोळे, संभाजी ब्रिगेडचे दयानंद काजळे ,मराठा सेवा संघ अध्यक्ष योगेश पवार,दिलीप काजळे, दशरथ गायकवाड, मनोज इंगवले, समाधान मोरे, निशांत कवडे,प्रसाद मोरे, संतोष पाटील, ज्ञानेश्वर भोसले, गोपीचंद लोंढे, प्रदीप सुरवसे,उमेश साळुंखे,रोहन जगताप अंकुश मोरे, नाना काजळे. प्रविण देशमुख, सिध्देश्वर मोरे यांच्यासह शहर आणि ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले पोलीस निरीक्षक अविनाश पवार यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.