भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराचे अध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा बँकेच्या महिला प्रतिनिधी आणि नागरी सहकारी बँका व नागरी सहकारी पतसंस्था या दोन मतदारसंघातून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्याकडे दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी त्यांच्यासोबत सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे हे उपस्थित होते.
याचवेळी ज्येष्ठ नेते शहाजी पवार यांचेही यावेळी आगमन झाले या दोन्ही समविचारी नेत्यांनी आपली एकमेकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले.
Post Views: 7