सोलापूर : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विरोधकांची यंत्रणा मोडून काढत महाविकास आघाडीने मिळवलेल्या दणदणीत विजयाचे जोरदार स्वागत दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे येथे करण्यात आले.
महाविकास आघाडीच्या पुणे पदवीधरच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव, मराठवाडा पदवीधरचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील आणि नागपूर पदवीधरचे उमेदवार अॅड. अभिजित वंजारी या उमेदवारांचा घवघवीत विजय झाल्याबद्दल उळे येथे कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि मिठाई वाटून जल्लोष साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष प्रशांत गायकवाड, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष दिनेश शिंदे, माजी सरपंच सुरेश डांगे, शिवसेनेचे सागर शिंदे, राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष अक्षय शिंदे, सोसायटी चेअरमन महादेव सोनटक्के, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महादेव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सीताराम जाधव, अशोक मिसाळ, शिवाजी मोहिते यांच्यासह राकेश कासार, दशरथ मंजाळ, ज्ञानेश्वर शिंदे, पिंटू रोमन, प्रमोद भुसारे, हरी सोनटक्के, आबा जाधव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















