पंढरपूर – अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग (मुले) स्पर्धा दिनांक ३० ऑक्टोबर ते ०६ नोव्हेंबर २०२६ या कलावधीत गलगोटीया युनिव्हर्सिटी, नोइडा, उत्तर प्रदेश यांनी आयोजित केलेल्या असून या स्पर्धेमध्ये पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बॉक्सिंग संघ सहभागी होणार असून तत्पूर्वी खेळाडूंचे १९ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर असे १० दिवसांचे बॉक्सिंग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन उमा महाविद्यालय, पंढरपूर येथे करण्यात आले होते. सर्व खेळाडूंना संथेचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष मुकुंद परिचारक, सचिव राजगोपाल भट्टड, खजिनदार रमेश लाड, संथेचे विश्वस्त अॅड. प्रणव परिचारक, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा संस्थेचे विश्वस्त डॉ. मिलिंद परिचारक, इतर संस्था पदाधिकारी, व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धिरजकुमार बाड यांनी खेळाडूंना स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देऊन खेळाडूंचा सत्कार केला. उमा महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद ढवण प्रशिक्षक म्हणून तर प्रा. डॉ. जगदीश चेडे व्यवस्थापक म्हणून स्पर्धेसाठी खेळाडूंसोबत जाणार आहेत. सत्कार कार्यक्रमाप्रसंगी प्रा.अनिल परमार, प्रा.डॉ.गोविंद भोसले, प्रा.डॉ. विलास बंडगर, कार्यालयीन अधीक्षक श्री. सज्जन लोंढे, तसेच प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धेसाठी पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ बॉक्सिंग (मुले) संघ पुढील प्रमाणे महेश मल्हारी गायकवाड -५० किलो वजन गट (छत्रपती शिवाजी नाईटकॉलेज, सोलापूर), यश सतीश चव्हाण ५५ किलो वजन गट (एस.के .एन सिंहगड कॉलेज, कोर्टी), प्रभुद्धपाल दादासाहेब बनसोड ६० किलो वजन गट (छत्रपती शिवाजी नाईटकॉलेज, सोलापूर), आकाश महेश गोडसे ६५ किलो वजन गट (एस,एम.कॉलेज, अकलूज), प्रथमेश अजुर्न पाटील किलो वजन गट ७० किलो वजन गट (के.बी.पी. महाविद्यालय,पंढरपूर), उबेद करीम अत्तार ७५ किलो वजन गट (एस,एम. कॉलेज,अकलूज), साईराज प्रदीप ननवरे ८० किलो वजन गट (एस. एम. एस. एम. पी. महाविद्यालय, नातेपुते), रोहित रामचंद्र चव्हाण ८५ किलो वजन गट (उमा महाविद्यालय,पंढरपूर), आनंद विठ्ठल वाघमारे ९० किलो वजन गट (उमा महाविद्यालय,पंढरपूर), रामेश्वर तुकाराम येलगुंडे ९०+(पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), प्रशिक्षक डॉ. आनंद ढवण व व्यवस्थापक प्रा. डॉ. जगदीश चेडे काम पाहणार आहेत.
Post Views: 7