जेऊर – चिखलठाण (ता करमाळा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील बाळगोपाळांनी दहीहांडी कार्यक्रम उत्साहात साजरा केला. सुरवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन नवनाथ सरडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रास्ताविकात शिक्षक नवनाथ मारकड यांनी उपस्थित मुलांना एकीचे महत्त्व पटवून देत दुध दही तुप यांचा आरोग्यदायी आहारात वापर याविषयी माहिती दिली यावेळी नवनिर्वाचित शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांचा सन्मान शाळा व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक शामराव गव्हाणे होते. उपस्थितांचे स्वागत शिक्षक सुनील गलांडे, शिक्षक राजू लोंढे मुख्याध्यापक पुजा लोंढे यांनी केले .कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कार्यक्रमास प्रशांत लगस ,सुनील पवार अमोल मराळ सुनील कुचेकर, सचिन क्षिरसागर , गजेद्र पोळ, शंकर पोळ,अमोल जाडकर , सुदर्शन पवार प्रशांत हरिहर, इसाक इनामदार, आकांक्षा सचिन रोकडे, सुशांत आजिनाथ बोराडे, नीता कचर पोळ, .राजीव कवितके, आनंद गजराम पोळ कल्याण भोसले, अंगणवाडी सेविका, मदतनीस, माता पालक भगिनी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी:-चिखलठाण तालुका करमाळा येथील जिल्हा परिषदेचे शाळेत दहीहंडी साजरी करणारे विद्यार्थी , शिक्षक व ग्रामस्थ.