पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील चौकीनजीक निरा उजव्या कॅनालवरील इस्पीक ताबडतोब दुरुस्त करण्याची मागणी पिलीव पंचायत समीती गणाच्या सदस्या नम्रता पुकळे यांनी फलटण येथील निरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे .

हा इस्पीक गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. या इस्पीक मधुन झिंजेवस्ती, कुसमोड, मळोली ,शेंडेचिच या गावासाठी पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी पाणी सोडले जात होते.तसेच पावसाळ्यात धरणात पाणी जास्त झाल्यानंतर या सर्व गावातील बंधारे ,तळी या पाण्याने भरली जातात. तसेच उन्हाळ्यात अडचणीच्या काळात या चार पाच गावांना यामधुन पाणी सोडता येते. यामुळे हा इस्पीक ताबडतोब दुरुस्त करण्याची मागणी पिलीव पंचायत समिती गणाच्या सदस्या नम्रता पुकळे यांनी फलटण येथील निरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता मोरे साहेब यांच्याकडे केली आहे.याची दखल घेत निरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता मोरे यांनी ताबडतोब याठिकाणी येऊन सदरच्या इस्पीकची पाहणी करुन दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले .यावेळी माळशिरस विभागाचे अभियंता काळे तसेच शिवराज पुकळे, ठेकेदार खंडु माने यांच्यासह अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. फोटो _ पिलीव येथील निरा उजव्या कॅनालवरील इस्पीकची पाहणी करताना कार्यकारी अभियंता मोरे ,शिवराज पुकळे व इतर मान्यवर.




















