अकलूज – सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये गळीत हंगाम २०२६-२७ चे मील रोलरचे पूजन बुधवार दि.०८/०७/२०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.श्री.शंकरराव रामचंद्र (आबासाहेब) माने-देशमुख यांचे शुभहस्ते संपन्न झाले.
कारखान्याचे मार्गदर्शक संचालक मा.श्री.विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे कुशल मार्गदर्शनाखाली व चेअरमन मा.श्री.जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याची वाटचाल प्रगतीपथावर आहे.
कारखान्याने गत हंगाम २०२५-२६ मधील सर्व ऊस पुरवठादार शेतक-यांची ऊस बीले, तोडणी वाहतूक बीले अदा केली आहेत.
सदर कार्यक्रम प्रसंगी कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, रावसाहेब मगर, अमरदिप काळकुटे, गोविंद पवार, जयदिप एकतपुरे, सुभाष कटके, रामचंद्र ठवरे, संचालिका सुजाता शिंदे, तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटीचे संचालक पांडूरंग एकतपुरे, श्रीकांत बोडके, दत्तात्रय मगर, अशोक पताळे तसेच कार्यलक्षी संचालक जयवंत माने-देशमुख, माजी संचालक भिमराव काळे, भारत फुले, शिवाजी सिद, विजय माने-देशमुख, राजेंद्र मोहिते, कार्यकारी संचालक सुहास यादव, सर्व खातेप्रमुख, कामगार व युनियन प्रतिनिधी उपस्थित होते.
Post Views: 7