छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सम्राट सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने नगर परिषद शाळा क्रमांक २१ व नगर परिषद शाळा क्रमांक २ धाराशिव येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप करण्यात आला या उपक्रमांतर्गत दोन्ही शाळांतील एकूण ५० विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या उज्ज्वल भविष्यास हातभार लागावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय थोरात, संस्थेच्या सचिव सौ. सुप्रिया थोरात,
कार्यक्रमास नगर परिषद शाळा क्रमांक २१ च्या मुख्याध्यापिका श्रीमती सुवर्णा धोत्रे, शिक्षिका श्रीमती जयश्री मिंढे, तसेच नगर परिषद शाळा क्रमांक २ च्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना सुरवसे आणि संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असून, भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
Post Views: 9