सांगोला – पलपब प्रकाशन संस्था अहमदाबाद (गुजरात), महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सांगोला, सांगोला अर्बन बँक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सांगोला महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब फुलांचा शब्दोत्सव २०२६ या विशेष उपक्रमांतर्गत या वर्षाचे विविध मानाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि.७ जुलै रोजी दु.२ ते ५ या वेळेत महात्मा फुले सभागृह, सांगोला अर्बन बँक येथे संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमात सांगोला तालुका व परिसरातील अनेक नामवंत व उदयोन्मुख कवींना सादरीकरणासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजकांच्या वतीने मनिषा ठोंबरे यांनी दिली.

















