Saturday, July 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर येथील अनधिकृत चर्च आणि मनपा सेवकाच्या गैरकृत्यांची चौकशी होणार!

तरुण भारतbyतरुण भारत
June 30, 2026
in solapur
0
सोलापूर येथील अनधिकृत चर्च आणि मनपा सेवकाच्या गैरकृत्यांची चौकशी होणार!
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर शहरातील बापूजीनगर येथील शासकीय समाजमंदिराचा बेकायदेशीरपणे ‘चर्च’ म्हणून वापर करणे, परिसरात धार्मिक तेढ निर्माण करणे आणि हिंदू आरक्षणाचा गैरवापर करून शासकीय नोकरी लाटणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिक दत्तात्रय कानेपागूल उर्फ येहान मार्क कानेपागूल याच्या कथित गैरकृत्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे (भा.प्र.से.) यांनी दिले आहेत. या संदर्भात आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त श्रीमती सोनाली यादव यांना त्वरित अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.

या प्रकरणाबाबत हिंदु राष्ट्र सेना आणि हिंदु जनजागृती समिती पाठपुरावा केला आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन घेत सोलापूरचे माजी मंत्री व आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांकडे या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री मा. श्री. आशिष जयस्वाल यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करत सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महानगरपालिका आयुक्त आणि राज्यमंत्री या दोघांनीही एकाच वेळी चौकशीचे चक्र फिरवल्यामुळे आता या प्रकरणाची सर्व अंगाने चौकशी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासकीय वास्तूवर थेट अतिक्रमण  सोलापूर महानगरपालिकेने हे समाजमंदिर केवळ सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी भाडेतत्त्वावर दिले होते. या कराराची मुदत संपलेली आहे. तसेच मूळ कराराच्या अनेक अटी धाब्यावर बसवून या सार्वजनिक वास्तूला बेकायदेशीरपणे ‘चर्च’चे स्वरूप देणे हे थेट ‘कायदेशीर अतिक्रमण’ ठरते. परिसरातील लोकांना ध्वनिक्षेपक मोठ्या आवाजामुळे त्रास देणे, गरीब हिंदूंचे धर्मांतर करणे, धार्मिक भावना दुखवणारी वक्तव्य करणे आदी अनेक गैरकृत्य तेथे होत असल्याच्या तक्रारी आहेत.

मनपा सेवक कानेपागूल याने ‘हिंदू मोची’ समाजाच्या आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय नोकरी मिळवली. मात्र सद्यस्थितीत तो ख्रिश्चन धर्म स्वीकारून ‘जिजस गॉस्पेल सोसायटी’चा मुख्य पास्टर म्हणून काम पाहत आहे. शासकीय सेवेत राहून दुहेरी लाभ घेणे हा शासनाची फसवणूक करणारा गंभीर गुन्हा आहे.

राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला मज्जाव या सार्वजनिक समाजमंदिरात स्थानिक नागरिकांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जांबमुनी महाराज यांची जयंती साजरी करण्यास मज्जाव केला जातो. तसेच, ध्वनिक्षेपक लावून हिंदू देवी-देवतांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्ये करून समाजात सामाजिक सलोखा बिघडवण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे.

 

हिंदु जनजागृती समितीच्या प्रमुख मागण्या:
 

‘जिजस गॉस्पल सोसायटी’चा महानगरपालिकेसोबतचा भाडेकरार रद्द करून ती वास्तू त्वरित सील करावी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी खुली करावी, अशी प्रमुख मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तसेच ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९’ चा भंग केल्याप्रकरणी मनपा सेवक कानेपागूल याला सेवेतून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. यासोबतच, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्याच्या जात प्रमाणपत्राची फेरचौकशी करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल त्याच्यावर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.

“प्रशासनाने आणि विधी व न्याय राज्यमंत्र्यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशांचे आम्ही स्वागत करतो. आता प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता पुढील १५ दिवसांत संबंधित अनधिकृत चर्चची वास्तू सील करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिला आहे.

Post Views: 36
Previous Post

न्यासाचे भक्ताभिमुख कार्य – नूतन पोलीस निरीक्षक अविनाश एकनाथ पवार

Next Post

बार्शीत घरातून साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बार्शीत घरातून साडेचार लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

ताज्या बातम्या

टेम्भुर्णी जवळ उजनीची पाईपलाईन फुटली हजारो लिटर पाणी गेले वाया #viral #marathinews #solapurnews

July 18, 2026

महाराजांच्या पालखीचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले #viral #solapurnews

July 18, 2026

देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरू झाली

July 18, 2026

अगदी अजित दादांसारखे अभिनंदन केले उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारानी #viral #news

July 18, 2026
१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

१२८ शाळा महापालिकेकडे हस्तांतरणानंतर पहिलीच मुख्याध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

July 17, 2026
गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

गोव्यातील कार्यक्रम श्रीकांत मोरे यांचे प्रतिपादन

July 17, 2026
आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त पोलीस आयुक्तालयात कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम 

July 17, 2026
आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

आर्या पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची मोहोळ कृषी विज्ञान केंद्रला भेट

July 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0984004

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!