सांगोला – उत्कर्ष प्राथमिक विद्यालय, सांगोला येथे शनिवार दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन व श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. याप्रसंगी शिक्षिका शुभांगी कवठेकर यांनी विद्यार्थ्यांना डॉ.राधाकृष्णन यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन शिक्षक दिनाचे महत्त्व पटवून देत कृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी कृष्ण-राधेची नयनरम्य वेशभूषा साकारून विविध भक्तीगीतांवर बहारदार नृत्ये सादर केली. यावेळी इयत्ता तिसरीच्या बालचमूंनी मानवी मनोरा रचून उत्साहात दहीहंडी फोडत आनंदोत्सव साजरा केला. हा सोहळा मुख्याध्यापिका विश्रांती मागाडे, उपमुख्याध्यापिका स्वराली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिक्षिका स्नेहल रसाळ, उत्तम नियोजन सांस्कृतिक प्रमुख दिपाली माळी यांनी केले. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Post Views: 9