सोलापूर – सातव्या संस्कृती नाट्य योजनेचे नुकतेच प्रसिद्ध सिने अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. यावेळी शिवाजी उपरे, कलावंत समिधा गुरु, अतुल महाजन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला सचिन खेडेकर यांच्या हस्ते नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि दीप प्रज्वलन करून या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना सचिन खेडेकर म्हणाले की
सध्या रंगभूमीवर वेगवेगळ्या विषयाचे नवनवीन नाटके येत आहेत आणि अशा नाट्य योजनांमुळे हे नाटके आता पुण्या मुंबई पुरतीच मर्यादित न राहता सोलापूर सारख्या शहरात देखील येऊ लागली आहेत याचा सोलापूरच्या नाट्य रसिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सिने अभिनेते सचिन खेडेकर यांनी यावेळी केले.
या योजनेत पाच दर्जेदार व्यावसायिक नाटके व काही सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याची सुवर्ण संधी सोलापूरकराना मिळणार आहे.
यावेळी सचिन खेडेकर यांच्या हस्ते श्री गिरीश
पुकाळे व श्रीराज निकते या नवीन सदस्यांना प्रवेशिका देण्यात आले.
शेवटी नाट्य वितरक शिवाजी उपरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.





















