सांगोला – क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्पोर्ट्स कराटे असोसिएशन, सोलापूर यांच्या सहकार्याने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मुलींच्या कराटे स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सांगोला मधील प्रणिता जाधव हिने प्रथम क्रमांक पटकावत तिची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच एकता काळेल हिने द्वितीय क्रमांक मिळवला. यांना कराटे असोसिएशनचे गौतम वाघमारे, सुनील वाघमारे, श्रावणी वाघमारे तसेच स्कूलचे क्रीडा शिक्षक पंचाक्षरी स्वामी, आरिफ तांबोळी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या अध्यक्षा नीलवर्णा रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ.अमित रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, प्राचार्य सिकंदर पाटील, सारिका रुपनर यांनी यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.
Post Views: 10