पंढरपूर – पंढरपूर तालुका पोलिसांकडून एकूण ३ लाख २५ हजार रुपयाची विदेशी दारू पंढरपूर तालुका पोलिसांनी केला जप्त केली. या प्रकरणी एका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलिसांच्या या कारवाई बाबतची सविस्तर माहिती अशी की, आगामी काळातील सण उत्सव तसेच आषाढी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पुळुज या गावी मंगळवारी (२३ जून २०२६) येथील सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिसांनी छापामारी ( रेड) करून एकूण २५ बॉक्स रॉयल चॅलेंज, रॉयल स्टॅग आणि रोमॅनो असे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण तीन लाख २५ हजार रुपयाची विदेशी दारू अन्सार शेख ( वय ५०, रा. पुळूज,ता. पंढरपूर ) याच्या घराच्या बाजूला असलेल्या खोलीतून जप्त केली. या प्रकरणी अन्सार शेख याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी अधिनियम ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कवाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, पीएसआय भारत भोसले, निलेश गायकवाड,पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक भोसले, मंगेश रोकडे, पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी, संतोष चव्हाण, विजयकुमार आवटी, चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे, हासन नदाफ यांच्या पथकाने पार पाडली.
Post Views: 32