अक्कलकोट : पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अक्कलकोट तालुक्यातील 20 मतदान केंद्रावर अत्यंत चुरशीने कुठेही अनुचित प्रकार न घडता शांततेने पदवीधर ८५.२६ तर शिक्षक मतदरसंघ ९४.६६ टक्के मतदान झाले.
Hide quoted text
अक्कलकोट शहरातील येऊन चौक येथील वरिष्ठ प्राथमिक शाळा येथील पदवीधर बूथवर 635 पैकी 540, शिक्षक करिता 391 पैकी 363, जेऊर येथे पदवीधर करिता 96 पैकी 91, शिक्षक 251 पैकी 208, मैंदर्गी येथे पदवीधर 327 पैकी 271, शिक्षक 71 पकी 69, दुधनी येथे पदवीधर 118 तर शिक्षक 50 मतदारांनी मतदान केले.
अक्कलकोट, चपळगाव, दुधनी, जेऊर, मैंदर्गी, तडवळ, वागदरी, वळसंग, बोरामणी आणि धोत्री आधी मतदान केंद्रावर सकाळच्या दरम्यान मतदानासाठी पदवीधर व शिक्षक मतदारांनी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. मात्र दुपारच्या सत्रात उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदान कमी झाले त्यानंतर दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान पुन्हा मतदाराच्या रांगा लागल्या होत्या. यंदा प्रथमच अत्यंत चुरशीने व शांततेने मतदान झाले. प्रत्येक शाळांमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले होते या प्रत्येक ठिकाणी शिक्षक आणि पदवीधर मतदारांसाठी स्वतंत्र मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. शिक्षक व पदवीधर मतदारांची धावपळ पाहायला मिळाली. काही शिक्षक हे शहरात स्थायिक झाले असल्याने त्यांचे शिक्षक मतदार संघाकरिता गावाकडील केंद्रात मतदान तर शहरात राहत असल्यामुळे येथील पदवीधर मतदान केंद्रावर मतदान करण्यास धावपळ झाली.
पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता जाधव व शिक्षक मतदार संघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट सह जिल्ह्यात विविध शाळा महाविद्यालय व शिक्षण संस्थांना भेटी देत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मोठी व्हूवरचना आखली होती. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी शहरातील पदवीधर व शिक्षक मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठीवर भर देऊन भाजपासाठी मतदान करण्याचे आवाहन केले. याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समिती निहाय गटातील मतदारांना मतदान करण्याकरिता जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी आपल्या गण व गटातील मतदाराच्या गाठीभेटी घेत मोठ्या प्रमाणात मतदान करून घेण्यात आले. याकरिता भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, पक्षनेते यशवंत धोंगडे, नगरसेवक महेश हिंडोळे, कांतु धनशेट्टी, अविनाश मढीखांबे, देविदास कवटगी, रमेश कापसे, प्रवीण शहा, शिवसेना जोजन, नगरसेविका अपर्णा सिद्धे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेतले.
तर शिवसेनेचे शिक्षक मतदार संघातील उमेदवार सचिन सानप यांच्याकरिता माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी मतदारसंघातील मतदारापर्यंत पोहोचून मतदान करण्याचे आवाहन केले होते. काँग्रेस पक्षाच्या वतीने शिक्षक मतदार संघातील उमेदवार जयंत आसगावकर, राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने माजी आमदार दत्तात्रय सावंत आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पदवीधर मतदारसंघात खरी लढत ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव व राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांच्यात होत आहे. दोन्ही मतदारसंघातील झालेल्या मतदानाची मतमोजणी मंगळवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी होणार असल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
Post Views: 7