सोलापूर : वारकऱ्याने पांडरंगाशिवाय दुसरा कोणताही देव मानलेला नाही.परमात्मा पांडुरंग हेच वारकऱ्यांचे एकमेव दैवत आहे.पांडुरंगाच्या दर्शनाने आत्मिक समाधान मिळते,असे विचार श्री.संत नामदेव महाराजांचे व फड परंपरेचे विद्यमान वंशज
ह.भ.प.माधवबाबा महाराज नामदास यांनी मांडले.
अधिक मासानिमित्त दमाणी नगरातील गड दर्शन समाज मंदिरात ह.भ.प.माउली महाराज बचुटे – सवाळकर शिष्य-मित्र परिवाराच्यावतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळच्या सत्रात ह.भ.प.माधवबाबा महाराज नामदास
यांचे कीर्तन पार पडले.नामदास महाराज म्हणले, एकादशीचे व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे.दिवसभर चर पण एकादशी कर, असे विनोदाने म्हंटले जाते.कीर्ती आणि नामाचा महिमा वाढण्यासाठी एकादशी व्रत केले पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज सर्वव्यापी आहेत.
पांडुरंगासारखं दुसरे दैवत नाही. राजालासुद्धा पांडुरंगासमोर नतमस्तक व्हावे लागले आहे.देवाच्या बद्धल अनेकांच्या शंका आहेत.वार आला की माणसाचा देव बदलतो,असे सांगत नामदास महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून दृष्ठान्त देत सावळ्या विठुरायाचा महिमा विषद केला.
कीर्तनाचे चार प्रकार आहेत.नाम कीर्तन, विडा कीर्तन, स्वरूप कीर्तन, गुण कीर्तन . नाम कीर्तन सर्वात सोपे कीर्तन आहे.कीर्तनाची देवाला मोठी आवड आहे.पुंडलिकांच्यासमोर नामदेवाचे कीर्तन सुरू असताना साक्षात पांडुरंग टाळ घेऊन उभे होते.जनाबाईची अज्ञा शिरसावंध मानून ज्ञानेश्वर महाराज उठले आणि कीर्तनात रंगून गेले. देवाचे सतत नामस्मरण करतात त्यालाच कीर्तन म्हणतात. प्रत्येक संतांच्या वाड:मयाचा विचार केला तर सर्व किर्तनकारांनी त्यावर कीर्तन केले पाहिजे.
श्रोत्यांना त्याची ओळख झाली पाहिजे.कीर्तनात नाचावं मात्र नको तिथे नाचू नये. समाज इतका खाली आला आहे, की महिलासुद्धा लग्नात नाचत आहेत . लग्नात हलगी वाजू लागली आहे, यासारखे दुर्दैव काय ? अशी खंतही नामदास महाराजांनी व्यक्त केली .
साधनं अनेक आहेत, मात्र नामसंकिर्तनासारखे दुसरे साधन नाही.संत संगत निरंतर करा,असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.सुंदर बंगला आहे, आणि बंगल्यासमोर तुळस नसेल तर घराला स्मशानरूप येते. जिथे तुळस नाही, तिथे समाधान नाही. तुळशीचे तीर्थ दररोज घेतले पाहिजे. महिलांनी तुळशीला प्रदक्षिणा घालावी. तुळशीची माळ गळ्यात असावी, असे नामदास महाराजांनी सांगितले.
Post Views: 9